Thursday, December 25, 2014

" निळ्या आकाशी "

निळ्या निळ्या आकाशी
निघाला बगळ्यांचा थवा ।
डोंगराआड दुर जाणारा सुर्य
त्यलाही बघा एकांत हवा ।
संथपणे वाहणारा वारा
विसावतो घेउन गारवा ।
Sanjay R.

खुणावते नजर तुझी
धुंद करी का मजला ।
ओठ माझेही अधीर झाले
चुंबन देण्या ग तुजला ।
गोड गुलाबी गाल तुझे
करी इशारा माझ्या मनाला।
काळ्या केसांची सुंदर बट
जागवते ओढ क्षणा क्षणाला ।
Sanjay R.

Sunday, December 21, 2014

" आठवणी "

स्तब्ध बसला असतो मी
डोळे लाउन तुझ्या वाटेवर ।
चाहुल तुझी लागताच
आनंद झळकतो मनावर ।
Sanjay R.

आठवणीत तुझ्या मी
साद तुझीच घेतो ।
नसतांना तु मग ।
स्वप्नांना उजाळा देतो ।
Sanjay R.

मी तुझा नी तु माझी
नाही मधेच कोणी ।
मनात बिंबवलं तुज
गाऊ प्रेमची गाणी ।

गंध केवड्याचा पसरला
मधेच डोकावतो मोगरा ।
मन फुलारले आता
दिसे निशीगंधही साजरा ।

होइल सारं मनातल
येईल प्रेमाला भरती ।
गोल आहे ही धरा
जाऊ भेटुनच वरती ।
Sanjay R.

" बाळ माझा "

बाळा मी तुझी नी तु माझा
नाही रे दुर इथे कोणी ।
बिंबवल मनात तुज
गाते अंगाईची गाणी ।

होइल रे मनातल सार
आहेस तु मोठा गुणी ।
प्रेम माझे तुझ्या सये
माझ्या गळ्यातला तु मणी ।
Sanjay R.

" आला थंडीचा महीना "

चढला सुर्य डोक्यावर
उन आल दारावर ।
तरी थंडी म्हणे मीच
स्वेटर असु दे अंगावर ।
Sanjay R.

पारा थंडीचा
जास्तच घसरला ।
गार पाण्यात
हात ओला ।
स्वेटर ब्लॅकेट
टोपरे कानाला ।
कप चहाचा
आनंदी झाला ।
शेकोटीला
कचरा मिळला ।
आइस क्रीमचा
स्वाद  पळाला ।
गरम भजीचा
नास्ता आला ।
हु हु हु हु आता
सांगु कुणाला ।
Sanjay R.

Saturday, December 20, 2014

" शाम ढल चुकी "

सकाळ येयी घेउन आनंद ।
नव्या आशा नव्या आकांक्षा ।
पुरी करायची स्वप्न आता ।
संपली सारी प्रतीक्षा ।
Sanjay R.

जाग मीत्रा जाग ।।
करु नको मला ट्याग
वाॅलवर माझ्या होते भागमभाग ।
मलाही येतो याचा राग
नाही तर करील तूझा त्याग ।
जाग मित्रा जाग ।।
Sanjay R.

आज ना मुलाकात होगी
नाही कोइ बात होगी ।
ढल चुकी शाम अबतो
बस अभी रात होगी ।
बित गया वक्त अभी
सपनोभरी निंद होगी ।
रोशनी होगी सुबह जब
मुलाकात बस तभी होगी ।
Sanjay R.