Friday, October 31, 2014

" देवा तुझीच रे माया "

देवा तुझीच रे माया
तुझीच इच्छा ।
आम्हा क्रुपा द्रुष्टी लाभु दे
हीच सदीच्छा ।

करता करविता
तुच रे देवा ।
आठवतो तुला
हाच अनमोल ठेवा ।

मन उदास आज माझे
कानात कर्कश ढोल वाजे ।
क्रुपा व्रुष्टी होउ दे रे देवा
आभार मनोमन मानील तुझे ।
Sanjay R.

Wednesday, October 29, 2014

" नशिब "

ख्वाइशे हो हजारोमे
करो कुछ थोडासातो
पायेंगे हम लाखोमे ।
नसिब तो बदलता रहता
ना सोचो सीर्फ ख्वाबोमे ।
Sanjay R.

समुद्रा इतक्याच अथांग
इच्छा असतात मनात ।
मिळाले जरी थेंबभर
सुखावतो आपण क्षणात ।
आनंद होतो इतका
की मावत नाही गगणात ।
Sanjay R.

कुणी ना फारच
असतात हट्टी ।
करंगळी दाखवुन
घेतात कट्टी ।
Sanjay R.

Sunday, October 26, 2014

" चिंतेची वारी "

येणार ति म्हणुन
तयारी केली सारी ।
ति आली आणी गेली
विचार आता भारी ।
पगार तर केव्हाच सरला
दिवस रात्र चिंतेची वारी ।
Sanjay R.

अवतरता सुर्यकिरण
निघे अंधार स्रुष्टीचा ।
स्वयंदीप प्रज्वलित होता
निघे काळोख मनाचा ।
Sanjay R.

Friday, October 24, 2014

" दिवाळी झाली "

आली दिवाळी
झाली दिवाळी ।
आवाजात फटाक्याच्या
बसली कानठळी ।
जेवणात मिळाली
गरम पुरण पोळी ।
घरोघरी रोषणाइ
उजळल्या दिपमाळी ।
लाभली आकाशाला
नवरंगी झळाळी ।
Sanjay R.

घेउन तुज मिठीत माझ्या
अनुभवायचा मज स्वर्गसुख ।
तु मी फक्त दोघच असु आपण
झेलायची आता थोडी रुखरुख ।

Tuesday, October 21, 2014

" आकाश "

बघुन तुझ्या नेत्रात आज
ओढ मजला अशी लागली ।
तु माझी अन मि तुझा
तुच माझी कविता झाली ।
Sanjay R.

क्षण तो अवचित आला
मन मोकळे करुन गेला ।
प्रितीची तुझ्या माझ्या
पावती तो देउन गेला ।
तन मन असे ओथंबले
चिंब चिंब भिजउन गेला ।
ओठ आता आतुर झाले
ये ना तु मधु प्राशनाला ।
Sanjay R.

चाहता हो दिल अगर
रोको ना अब लब्जोको ।
है इंतजार कानोको भी
खुलने दो अब होठोको ।
Sanjay R.

घेउन गाठोड विचारांच
घातल पालथ जग ।
हळु हळु संपतेय
श्वासातली धग धग ।

म्हणायच तुला जे
सांगुन येकदा बघ ।
निरभ्र होइल आकाश
निघुन जाइल ढग ।
Sanjay R.