Sunday, October 12, 2014

" वादळ "

वादळात सापडलेल मन
बाहेर निघायची तगमग
प्रतिक्षेत असलेले नेत्र
आणी
त्यात आनंदाची एक लहर
झोकुन द्यायच असत त्यात
विसरायची असतात दुखः
हवा असतो आनंद परमानंद
शोधात मी भटकतो दारोदर
लाभते मज हे कवितेत सारं ।
Sanjay R.

अब तक ना
समझ पाये उनको ।
हुवे हम उनके
पर ना हुवे वो हमारे ।
जब समझे थोडा
तो रिश्ताही न रहा ।
Sanjay R.

का रे तु हिरावलास
आनंद माझा ।
दिले सर्वस्व तुजला
आणी विसरलास मला ।
Sanjay R.

आनंदच माझा
दुर दुर जातोय ।
धरा कुणीतरी
गटांगळ्या मी खातोय ।
Sanjay R.

एक आठवण
नजरेपुढे क्षणन क्षण ।
दिवसा मागुन
दिवस जातात ।
घर आठवणींच
मोठ होत ।
हरवतो आपण
त्यातच मग ।
जगतो आठवत
मग कण न कण ।
Sanjay R. 

मनात अगणीत
विचारांच काहुर ।
क्षणात लागे मनी
एकच हुरहुर ।
क्षण निसटतो
जातो दुर दुर ।
Sanjay R.




" विजयादशमी करु साजरी "

निघाल्या उजळॣन
दश दीशा ।
उभारल्या उंच
विजय पताका ।।
पर्व विजया दशमीचे
करु साजरे ।
देउनी शमीपत्र
सन्मानाने एकमेका ।।
Sanjay R.

" एक श्वास "

ठाउक आहे मला
तु आहेस कशी ।
मनस्वी हसणारी
थोडी रुसणारी ।
फुल गुलाबाच बघुन
रुसवा विसरणारी ।
Sanjay R.

उनकी नजर को हम
युही नही ताकते ।
खो जाते  उनकी यादमे
रातभर बस युही जागते ।
सोचकर यही की
कही उनकी नजरको
किसी औरकी नजर ना लगे ।
Sanjay R.

नाजुक सुंदर मनोहारी
चंद्रप्रकाशात चमचमणारी ।
निशीगंधाची तर्हाच न्यारी
मनोमिलनाची ही तयारी ।
Sanjay R.

थांबतो एक श्वास
सरतात सारे भास ।
नसते सोबत कुणाची
शुन्य होतात प्रयास ।
Sanjay R.


Monday, October 6, 2014

" आओ सब पढे हम "

आओ सब पढे हम ।
पैरो पर होंगे खडे हम ।
जानेंगे कलम की ताकद हम ।
लिख पढ कर बढेंगे आगे हम ।
जिंदगीमे ना होगा कोइ हमे गम ।
बढेंगे आगे दिखायेंगे अपना दम ।
Sanjay R.

करुन उलथा पालथ
तुझ्या तस्वीरींची
प्रयत्न तुज शोधायचा
मी केला ।
सुमधुर गोड हसरा
चेहरा तुझा मनास माझ्या
सुखाउन गेला ।
Sanjay R.

लुक तुझा नवा नवा
वाटे का मज हवा हवा ।
दुर आकाशी बघ
विहरतो पक्षांचा थवा ।
Sanjay R.

आनंदी आणी उत्साही दीन ।
ईश्वरा पुढे होउ या लीन ।

Thursday, October 2, 2014

" वादळ "

भरली बॅग
झाली तयारी ।
बसच येयीना
प्रतीक्षा न्यारी ।
थकले डोळे
आली अंधारी ।
शेवटी पाइच
प्रवास जारी ।
Sanjay R.

शस्त्र असे हाती लेखणीचे
मनात वादळ विचारांचे ।
जीद्द ही अशी कायम
कशास मग आता थांबायचे ।
सुर्य चंद्र धरती आणी तारे
कवितेत स्थान यांचे मोलाचे ।
Sanjay R.