Monday, October 6, 2014

" आओ सब पढे हम "

आओ सब पढे हम ।
पैरो पर होंगे खडे हम ।
जानेंगे कलम की ताकद हम ।
लिख पढ कर बढेंगे आगे हम ।
जिंदगीमे ना होगा कोइ हमे गम ।
बढेंगे आगे दिखायेंगे अपना दम ।
Sanjay R.

करुन उलथा पालथ
तुझ्या तस्वीरींची
प्रयत्न तुज शोधायचा
मी केला ।
सुमधुर गोड हसरा
चेहरा तुझा मनास माझ्या
सुखाउन गेला ।
Sanjay R.

लुक तुझा नवा नवा
वाटे का मज हवा हवा ।
दुर आकाशी बघ
विहरतो पक्षांचा थवा ।
Sanjay R.

आनंदी आणी उत्साही दीन ।
ईश्वरा पुढे होउ या लीन ।

Thursday, October 2, 2014

" वादळ "

भरली बॅग
झाली तयारी ।
बसच येयीना
प्रतीक्षा न्यारी ।
थकले डोळे
आली अंधारी ।
शेवटी पाइच
प्रवास जारी ।
Sanjay R.

शस्त्र असे हाती लेखणीचे
मनात वादळ विचारांचे ।
जीद्द ही अशी कायम
कशास मग आता थांबायचे ।
सुर्य चंद्र धरती आणी तारे
कवितेत स्थान यांचे मोलाचे ।
Sanjay R.

Tuesday, September 30, 2014

" गुलाब काटा "


भाव कठोरतेचा
दाखवी काटा ।
सुंदर कोमळ
गुलाबी छटा ।
मोहक गंध
फुलांचा वाटा ।
प्रफुल्लीत मन
आनंदाच्या लाटा
Sanjay R.

सुर्य किरणांनी नटली धरा
विसावली रात्र हलताहेत माणसं
जरा जरा ।
Sanjay R.

" स्वच्छ भारत "

स्वच्छ भारताचे
स्वप्न होते गांधींचे ।
पुर्ण करु या मिळुन सारे
उद्दीष्ट आमच्या प्रधानाचे ।
निघेल कचरा घाण सारी
निरोगी जिवन जगु आनंदाचे ।
आम्ही सुधरु देश सुधारेल
सुख सौभाग्य बघु देशाचे ।
महान माझा देश हा भारत
जगात उंचाउ नाव ईंडीयाचे ।
Sanjay R.

Monday, September 29, 2014

" शोध "

मंत्र तंत्र सीद्धीयानी
सर्वस्वे मी गमावीलो ।
घेउनी यंत्र हाती
सुखीये हा जाहलो ।
तन मन धन तयाची
लुप्ती या नेत्री पाहीलो ।
होउनी कफल्लक आता
दारोदार भ्रमणी निघालो ।
इती यंत्र स्तुती स्तोत्र संपुर्णम ।
Sanjay R.

ठेउनी भान वेळेचे
जिवन आनंदात जगायचे।
आलाही म्रुत्युही सामोरा
खळखळुन त्यासी हसवायचे ।
अनमोल हे जिवन असे
ठरवायचे आपणच
कसे हे जगायचे ।
Sanjay R.

शोधतो आम्ही त्यास
सार् या  जगात ।
वसतो तो चराचरात ।
अज्ञानी पामर आम्ही ।
विसरतो शोधायचे अंतरात ।
ज्ञान स्वत्वाचे येता
होइल दर्शन क्षणात ।
Sanjay R.