Sunday, August 31, 2014

" आधाराला नको काठी "

कविता ही माझी
आहे तुझ्या साठी
नाते मैत्रीचे आणी
प्रेमाच्या गाठी ।
तु आहेस माझी
मी तुझ्या साठी ।
प्रवास आयुष्याचा
आधाराला नको काठी ।
Sanjay R.

दुखाःचा महा डोंगर तु
आयुष्यभर झेललास ।
सुख वाट बघतय बघ
वेळ नाही होणार खलास ।
Sanjay R.

कुठ कडमडलीस
कुठ धडपडलीस
ठाउक नाही मला ।
बर झाल आता
हाती डाॅक्टरच्या
तु सापडलीस ।
प्रयत्न शर्थीचे
करील तो
सोडणार नाही तुला ।
Sanjay R.

सोबत तुझी लाभली मजशी ।
लोपले दुखी बंध बघ वेदनेशी ।
द्विगुणीत आनंद नाते तुजशी ।
न उरे लालसा तुच मजपाशी ।
Sanjay R.

कुणाला म्हणायच आपलं
आणी कोण आहे परकं
फरक करण फारच कठीण
आपलेच देतात दगा तेव्हा
सरकते वाळु पाया खालुन
परकेच वाटतात आपल म्हणुन ।
Sanjay R.

Thursday, August 28, 2014

" बंध वेदनेशी "

सोबत तुझी लाभली मजशी ।
लोपले दुखी बंध बघ वेदनेशी ।
द्विगुणीत आनंद नाते तुजशी ।
न उरे लालसा तुच मजपाशी ।
Sanjay R.

कुणाला म्हणायच आपलं
आणी कोण आहे परकं
फरक करण फारच कठीण
आपलेच देतात दगा तेव्हा
सरकते वाळु पाया खालुन
परकेच वाटतात आपल म्हणुन ।
Sanjay R.

Tuesday, August 26, 2014

" आनंद "

पावसाचा बंध ।
मोगर् याचा गंध ।
मन बेधुंद ।
आनंदी आनंद ।
Sanjay R.

Sunday, August 24, 2014

" जाउ द्या मज काशीला "

जायचे मज काशीला
नको कुणाचा वशीला
विरोध माझा घुशीला
खाउ घालील म्हशीला
पाठवा त्यांना फाशीला
मिळेल माझ्या राशीला
पुरेल माझ्या शशीला
जाउ द्या मज काशीला
Sanjay R.

ना रोनाधोना
ना कोइ बहाना ।
साथ आपका हो तो
बस हसना और हसाना ।
Sanjay R.

सोड तुझा रुसवा
गाल तुझा हसवा
हट्ट थोडा फसवा
बघुन रुप तुझे
सरतो थकवा ।
Sanjay R.

कळेना मज तु हट्टी कीती ।
जडली माझी तुजवर प्रिती ।
शब्द संग्रह तुझी श्रिमंती ।
गुंतली तुझ्यात माझी मती ।
Sanjay R.

रमत गमत धरेवरी
उतरती पाउस धारा ।
सोबतीला त्यांच्या
गार गार वारा  ।
हळुच डोकावे जेव्हा
उन किरणांचा तारा ।
कोमेजुन जाइ धरा
तापी तो दिनकरा ।
Sanjay R.





" थिजले शब्द ओठी "

थांग मनाचा तुझ्या
मज लागेल कसा ।

भाव नेत्रातला
तुज उमजेल कसा ।

थिजले शब्द ओठी
सांग सांगु कसा ।

उफाळला डोह आता
मी थांबु कसा ।
Sanjay R.

श्वासात माझ्या
आभास तुझा ।
फुलला मोगरा
खास तुझा ।
दरवळला गंध
श्वास तुझा ।
प्रवासात मी
सोबती तुझा ।
Sanjay R.

प्रित अशी नको
ठेउस तु बंधनात। ।
होउ दे विचार
मोकळे थोडे ह्रुदयात ।
घेउ दे उंच
एक भरारी  गगणात ।
मिळेल मणभर
विसावा अंगणात ।
Sanjay R.