Saturday, May 17, 2014

" होउन कमळावर स्वार "

अबकी बार
दिग्गजांची  हार ।
आनंदी सारे
होउन कमळावर स्वार ।
Sanjay R.

अब अच्छे दीन आने वाले है ।
कोइ लड्डु खाने वाल है ।
कोइ आसुओमे खोने वाले है ।
पता अब हमे भी नही
क्या महंगाइ का गीत
अब भी गाने वाले है ।
दुवा करो अब मिलके  सारे
अच्छे दीन आने वाले है ।
Sanjay R.

Sunday, May 11, 2014

" झाड पैशाचे लावावे "

स्वप्न होते माझे
झाड पैशाचे लावायचे ।
गरीब श्रीमंत कोणीही असो
सगळ्यांना खुप वाटायचे ।
पोटभर जेउनच
प्रत्येकाने निजायचे ।
विसरुन रडायचे आता
हसत हसत जगायचे ।
Sanjay R.

डोंगर दरया कडे कपारी
वळण त्यांची अती भारी ।
करु नचा हो तिकडे स्वारी
ईकडेच जमेल दुनियादारी ।
Sanjay R.

" आई "

वास करी ईश्वर
आत्म्याच्या ठिकाणी ।
तुजपरी ग आई
नाही मज कोणी ।
जसे जिवन व्यर्थ
नसेल जर पाणी ।
आई तुजविण जगी
नसतेच ग कोणी ।
Sanjay R.

आई ती कुणाचीही असो
कठीण समजणे मन तिचे ।
निद्रेतही चिंता पाखराची
श्वासासंगे काळजी लेकरांची
Sanjay R.

Wednesday, April 30, 2014

" स्वप्नातली परी "

आहेस तु माझ्या
स्वप्नातली परी ।
छंदच जणु जडलाय
राणी माझी तुच खरी ।
Sanjay R.

उत्सुकता लागली मनाला
असेल कशी तुझी छवी  ।
साकारली स्वप्नात माझ्या
सदा वाटते हवी हवी ।
Sanjay R.












Tuesday, April 29, 2014

" ओळी चार "

मनी विचार आहेत अपार
सोसवत नाही त्यांचा भार ।
सरसावतो लिहीण्या ओळी चार
लेखणीची मात्र तुटते तार ।
Sanjay R.