Monday, March 31, 2014

" चाहुल उन्हाळ्याची "

चाहूल लागता उन्हाळ्याची
घसाही कोरडा पडू लागतो |
पाहताच थंड पेयाची गाडी
तहान अजुनच वाढते |
गळा ओला होताच
कस शांत त्रुप्त वाटते |
Sanjay R.

आला आला गुढी पाडवा
शेतात आता माणुस नवा ||
मेहेनत करू खूप देवा
पोट भरेल इतकाच दे
नाही आम्हा जास्त हेवा ||
Sanjay R.

" माणुस "

गर्दीत माणसांच्या
माणुस शोधायचा  ।।
मिळाला माणुस तर
त्यास देवच म्हणायचा ।।
Sanjay R.

नशीब तुझे चांगले
इथ तु हरवली नाही |
गर्दीत माणसांच्या
माणुसच उरला नाही ||
Sanjay R.

Wednesday, March 26, 2014

" झाले दौरे सुरु "

झाले दौरे सुरु
नेताजींचे दारोदारी ।
पाच वर्ष दिसणार नाहीत
सांगा यांना कुणीतरी ।
Sanjay R.

ये जवानी ये दिवानी
चल बनाये एक कहानी ।
मै राजा तु मेरी रानी
होंगे कभी हभ नानानानी ।
Sanjay R.

Friday, March 21, 2014

" खेळु रंगांची होऴी "

का ग राधे तु
म्हणवतेस स्वता:ला भोळी ।
जबरदस्तीन भरवलीस
मजला तु पुरण पोऴी ।
भिजायच होत तुला
खेळुन रंगांची होळी ।
नवरंगांनी नटलीस
चिंब भिजली साडी अन चोऴी ।
Sanjay R.

ज्याच जळत
त्यालाच ते कऴत ।
बाकीच्यांच काय
पैशान सार मिळत ।
Sanjay R.

आली आली  होळी आली ।
नवरंग ती उधळत आली ।।
रंग फासण्या तुमच्या गाली ।
फुलवी ओठी हास्याची लाली ।।
Sanjay R.

आली आणी गेली
रंगांची होली ।
निघता निघेना
गालावरची लाली ।
Sanjay R.

देखो आई रंगोकी होली ।
खाकर देखो भंग की गोली ।
ना करो ऐसी सुरत भोली ।
भर देंगे रंग हम साथ है टोली ।
ना मानेंगे अब दो जितनी गाली ।
खिलेगी अब ओठोकी लाली ।
Sanjay R.

Thursday, March 20, 2014

" परमार्थ "

शोधताना तुझ्या
शब्दातले अर्थ
होउ नये माझ्याकडुन
कुठला काही अनर्थ ।
नेहमीच कदाचीत
बघताना असेल
माझाच स्वार्थ ।
त्यातुनच कदाचीत
लाभेल आपल्या
जिवनाला परमार्थ ।
Sanjay R.